ग्राहकांसाठी खुशखबर ; महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये घसरण

नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दारात घसरण झाली आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हि एक खुशखबरच असणार आहे. तर मग सोन्याच्या भावात किती बदल झाला आहे. सोन्याचे नवीन दर जाणून घ्या.

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच चांदीच्या दारातही बदल झाला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 71 हजार 770 असून मागील ट्रेड मध्ये याच मौल्यवान धातूची किमंत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. तसेच बुलियन मार्केट या वेबसाइट नुसार चांदीची किंमत 89460 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मित्रांनो उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आणि हॉलमार्किंगमुळे सुद्धा सोन्याच्या किंमतीत वाढ होते का बघूया.

हॉलमार्किंगमुळे सोन्याची किंमत वाढते का ?

हॉलमार्किंगसाठी जास्त रुपये आकारले जात नाहीत. हा दर ठरावीक असतो यावर जीएसटी लागू केली जाते. हे शुल्क दागिन्यांच्या वजनावर आधारित नाही. दागिने वजनदार असोत किंवा हलके, प्रत्येक तुकड्याचे शुल्क सारखेच असेल. हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीत थोडीफार तफावत असते. gold price

सोन्याचे दागिने खरेदी करतांना ह्या गोष्टी आवश्य पहा.

तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुम्ही आधी ज्वेलर्सला सांगावे की तुम्हाला फक्त हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दागिने आवडत असल्यास, ते हॉलमार्क केलेले आहेत की नाही हे तुम्ही स्वतः तपासावे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी पहाव्या लागतील. सर्वप्रथम तुम्हाला BIS चा लोगो पाहावा लागेल. त्यानंतर त्यावर फ्युरिटी/फिनेस ग्रेड लिहिला जाईल.

त्यानंतर त्यावर सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड दिसावा, ज्याला HUID म्हणतात. या तिन्ही गोष्टी दागिन्यांमध्ये असतील तर ते हॉलमार्क दागिने आहेत. मार्केट मध्ये भरपूर बनावटीचे दागिने विकले जातात आणि ग्राहकांना फसविले जाते. त्यामुळे ह्या गोष्टी पाहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

24 कॅरेट आणि 22 कॅरेटमध्ये काय फरक ?

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोन्याचे दागिने साधारणपणे 18 ते 22 कॅरेटचे असतात. 24 कॅरेट सर्वात शुद्ध मानले जाते. पण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे अवघड आहे. हे दागिने तुटण्याची भीती असते. म्हणून 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत. 24 कॅरेट सोन्याचे सोन्याचे सिक्का ( बिस्कीट ) बनवून विकले जातात.

दागिने मजबूत करण्यासाठी त्यात इतर धातू जोडले जातात. आपण 22 ते 24 कॅरेटच्या शुद्धतेच्या पातळीबद्दल बोलत आहोत, तर 22 कॅरेट कमी शुद्ध आणि 24 कॅरेट अधिक शुद्ध असेल. याचा अर्थ 22 कॅरेटच्या दागिन्यांमध्ये इतर धातूंचे प्रमाण जास्त असेल. 24 कॅरेटमध्ये इतर धातूंचे प्रमाण नासर आहे. यामुळे 24 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा 22 कॅरेट सोन्याचे दागिने स्वस्त होतील. आणि सहसा सगळीकडे मार्केट मध्ये 22 कॅरेटचेच दागिने बनविले जातात. आणि मार्केटमध्ये विक्री केले जातात.

सोन्याच्या शुद्धतेबद्दल जाणून घ्या.

  1. सोन्याचा मुलामा: सोन्याचा मुलामा असलेल्या वस्तूंपासून सावध रहा. यामध्ये दुसऱ्या धातूवर सोन्याचा पातळ थर असतो आणि ते घन सोन्यापेक्षा कमी मौल्यवान असतात.
  2. मिश्रधातू: वेगवेगळे मिश्र धातु विविध कारणांसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, तांब्यामध्ये सोन्याचे मिश्रण केल्याने गुलाब सोने तयार होऊ शकते, तर पांढरे सोने बहुतेक वेळा पॅलेडियम किंवा निकेलसह मिश्रित केले जाते.
  3. शुद्धता टक्केवारी: लक्षात ठेवा की 24-कॅरेट सोने देखील 100% शुद्ध नसते. हे जवळजवळ शुद्ध सोने आहे परंतु तरीही त्यात इतर घटकांचे ट्रेस प्रमाण असू शकते.

Leave a Comment