नमस्कार मित्रांनो धर्मवीर आनंद दीघे साहेबाच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट आपण सर्वांनी पहिलाच असेल. या चित्रपटातील डायलॉग बऱ्याच जणांच्या लक्षात राहिल्या असतील. आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा लुक पण लक्षात राहिला असेल. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रसाद ओकनं साकारलेली आनंद दीघे साहेबांची भूमिका प्रेक्षकांना आवडली.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई देखील केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. अखेर मोठया प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर समोर आलाय. तर मग या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कोण आहेत, या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका कोण साकारणार आहे आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे सविस्तर बघूया.
धर्मवीर 2 हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . मुंबईतल्या मुख्यमंत्र्याच्या निवास्थानी नुकताच धर्मवीर 2 चं पोस्टर प्रदर्शित झालं. या सोहळ्याला अनेक मान्यवर हजार होते. बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल, अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, यांची खास उपस्थिती होती.
‘धर्मवीर 2’ ह्या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागलेली आहे. महाराट्राभर चर्चेचा विषय बनलेला धर्मवीर 2 हा चित्रपट क्रांतिदिनी म्हणजे येत्या 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित (release) होणार आहे. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर आधारित असणार आहे. या वेळेस पण अभिनेता प्रसाद ओक यांनीच धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली आहे. तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भूमिका साकारली आहे.
धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई , उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. दिग्दर्शन, संवाद, कथा आणि पटकथा सांभाळण्याचा धुरा प्रवीण विठ्ठल तरडे यांनी घेतला आहे तसेच महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे.आणि धर्मवीर 2 हा चित्रपट यंदा मराठीतच नव्हे तर, हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्राभरच नव्हे तर, संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे.
प्रवीण तरडे हे ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन करतील
प्रवीण तरडे हे आता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय दिगदर्शक बनले आहेत.प्रवीण तरडे यांनी बऱ्याच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव’ धर्मवीर यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित चित्रपटाचे धनुष्यबाण पेलण्यासाठी ते सज्ज असतात. ‘मुळाशी पॅटर्न आणि सरसेनापती हंबीरराव’ य हे चित्रपट तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते,
संपूर्ण महाराट्राभर चर्चेचा विषय बनले होते आणि आता प्रवीण तरडे हे ‘धर्मवीर 2’ च पण कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन करणार आहेत. मुंबईतल्या मुख्यमंत्र्याच्या निवास्थानी नुकताच धर्मवीर २ चं पोस्टर प्रदर्शित झालं. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. या चित्रपटाला एकनाथ शिंदेच मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून सर्वानी त्याच, मुख्यमंत्री म्हणून ते बजावत असलेल्या कामगिरीचं कौतुक केलं.
चित्रपटाविषयी काही प्रश्न :
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका को साकारणार आहे ?
‘धर्मवीर 2’ या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिककेत अभिनेता प्रसाद ओक हे दिसणार आहेत.
धर्मवीर 2 हा चित्रपट कधी रिलीस (प्रदर्शित) होणार आहे ?
‘धर्मवीर २’ हा चित्रपट क्रांतिदिनी म्हणजे येत्या 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित (release) होणार आहे.
‘धर्मवीर २’ हा चित्रपट कोणत्या भाषेत असणार आहे ?
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत असणार आहे.
‘धर्मवीर 2’ या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कोण साकारणार आहे ?
‘धर्मवीर 2’ या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते हे दिसणार आहेत.