नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही भागात अति मुसळदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पंजाबराव यांच्या अंदाजा कडे सर्व शेतकऱ्यांचे नजर लागलेले आहेत.
पंजाबराव डंख हे शेतकऱ्यांसाठी वारंवार पावसाबद्दलचे किंवा हवामानाबद्दलचे अंदाज दर्शवत असतात. शेतकरी कधी कोणते काम करवून घ्यायचे याविषयीची पण माहिती देतात.पंजाबराव डंख हे हवामानाचे अंदाज एकदम अचूक देतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्या वरती गाड विश्वास आहे.
त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पंजाबराव डंख यांच्या हवामान अंदाजाकडे असते. तसेच पंजाबराव डंख साहेब पण त्यांनी जे हवामानाबद्दल अंदाज वर्तवलेले असतात ते सर्व अंदाज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट करतात. जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातले हवामान अंदाज कसे राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. तर मग हा दिलेला अंदाज आपण सविस्तर बघूया.
मान्सून अपडेट :
जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेब म्हणाले कि शेतकरी मित्रांनो जे काही तुमचे शेतीतील कामे आहेत फटाफट करून घ्या. उरकून घ्या. कारण राज्यात 4 जुलै पासून ते 10 , 11 जुलै पर्यंत राज्यात झोरदार पाऊस पडणार आहे. ओढे नाले वाहायला लागतील एवढा पाऊस पडणार आहे. ठीक ठिकाणी छोट छोटे तळे असतील तर ते भरणार आहेत, अश्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
तसेच पंजाबराव डख साहेबा यांनी सांगितले आहे कि कोल्हापूर, सातारा, सांगली,लातूर नांदेड उत्तर महाराष्ट्र , अहमदनगर, सोलापूर, बीड,पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे.आणि ज्या-ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी राज्यातल्या बहितांश जिल्ह्यात चांगलं पाऊस पडतो असं हे म्हणाले. यंदा देखील राज्यात भरपूर पाऊस पडणार आहे. शेतकरी राजा आनंदून जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रत चांगलाच पाऊस चालू आहे.आणि राज्यात मुसलदार पाऊस पडणार आहे. असे अंदाज दिले जात आहेत. दरवर्षी अनेक शेतकरी शेतात काम करत असतात आणि गुरे चारवत असतात किंवा शेतीतले अजून कोणते काम करत असतात. महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात. दर वर्षी अनेक शेतकरी आणि जनावर याना वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागतो. झाड इमारती, घर अश्या बऱ्याच गोष्टींचं नुकसान होतं. त्यामुळे आपण अंगावर वीज पडू नये म्हणून किंवा कोणतीही जीवित्वाची हानी होऊ नये म्हणूनवयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.
अंगावर विज पडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ?
- हवामान खराब असल्यास शेताला कामांसाठी जनावरांना चारणे असेल किंवा शेतातील इतर एकही कामे असतील बाहेर पद्य नका. घरातच थांबा आणि प्रवास कारण टाळा.
- वीज चमकत असताना कोणतेही विद्युत उपकरणे चालवू नका.कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा धक्का बसणार नाही.
- टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते.
- ज्या काही धांतूंच्या वस्तू असतील जसे कि छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.
- सगळ्यात महत्वाचं म्हणजे विज चमकत असतांना मोठ्या झाडाखाली थांबणं आश्रय घेणं टाळाच. कारण उंच झाडे स्वतःला विजेकडे आकर्षित करतात.
- शेतजवळील तलाव, धरणं अश्या पाण्याच्या ठिकाणांपासून दूर राहा.
- वाहत्या पाण्याशी तुमचा संबंध येईल, अश्या कोणत्याही गोष्टी करू नका. कारण विजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्स मधून वाहू शकते. उदाउदाहरणार्थ- अंघोळ करणे, भांडी धुणं वैगेरे.
- मुलं आणि घरातील वृद्ध म्हातारी माणसं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खबरदारी करून घ्या, खात्री करून घ्या.
- इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर टाळा आणि जे लोंखंडी रॉड असलेली छत्री असतील ते वापरू नका.तशेच मोबाईल फोनचा किंवा टेलिफोनचा वापर टाळा.