Maharastra SSC 10th Result live : दहावीचा निकाल झाला जाहीर इथे करा चेक

नुकताच बारावीचा निकाल 21 मे रोजी रोजी जाहीर झाला आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुण मिळालेले आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या कि सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली असते.तर दहावीच्या विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहायचा ?

how to check 10th Result 2024 Maharastra Board Website

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल, सोमवारी 27 मे रोजी दुपारी वाजता तुम्हला पाहता येणार आहे.

विद्यार्थी या संकेतस्थळावरती जाऊन आपला निकाल पाहू शकता :

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digiloker.gov.in

https://results.targepublications.org

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल विद्यार्थ्यांनी कसा तपासायचा

  1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट म्हणजे – maharesult.nic.in वर प्रवेश करावा लागेल.
  2. वेबसाईट वरती परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव एंटर (click) करा.
  3. तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2024 प्रदर्शित होईल.
  4. तुम्ही तो निकाल तपास आणि डाउनलोड करा.
  5. त्यानंतर निकालाची प्रिंटाऊट घ्या.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल एसएमएसद्वारे

10वीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवरून एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये खाली दिलेल्या नंबरवर एसएमएस पाठवावा लागेल

MHSSC टाइप करा आणि जागा द्या आणि नंतर सीट नंबर टाइप करा

हा एसएमएस 57766 वर पाठवा

मेसेज पाठवल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर महाराष्ट्राचा दहावीचा निकाल मिळेल

दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईट वर ऑनलाईन स्वरूपात तर महाविद्यालयात ऑफलाईन स्वरूपात निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी मिळेल.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, ,छ्त्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करण्यात आली. या वर्षी महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षा 16 लाख 444 विद्यार्थ्यांनी दिलीये. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

गेल्या वर्षी, बोर्डाने दहावीच्या 2023 चा निकाल 2 जून रोजी जाहीर केला. उत्तीर्णतेची ऐकून टक्केवारी 93.83 इतकी आहे. या वर्षी दहावीच्या निकालाचा टक्का वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. आणि विद्यार्थी व पालकांच्या नजर या दहावीच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे.

Leave a Comment