Monoj Jarange Patil Movie : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार

सध्या मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘ संघर्षयोद्धा ‘ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातुन घेतला जाणार आहे.संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठीत असणार आहे.

मागील कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनात झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिकारी यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रूपात रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ( चित्रीकरण) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे सुरु झालं असून त्याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दशर्क आणि टीम आवर्जून उपस्थित होती.संघर्षयोद्धा या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला आली आहेत. सध्या सोशल मीडियावर ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या काही महिन्यापासून सर्वानाच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्षयोद्धा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार. या चित्रपटाचा अजून एक नवाकोरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि या ट्रेलरला खूप चांगली पसंती प्रेक्षकांकडून मिळाली आहे. तसेच या चित्रपटाला महाराट्राभर चांगलीच पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट १४ जून २०२४ ला महाराट्राभर प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे.सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे. आणि शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केले आहे.संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, संजय कुलकर्णी, विजय मिश्रा, श्रीनिवास पोकळे, माधवी जुवेकर, विनीत भोंडे, जयवंत वाडकर, गायत्री जाधव, सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, अरबाज शेख, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौघुले, सिद्धेश्वर झाडबुके,सुनील गोडबोले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटातील ” उधळीन जीव…” ह्या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं आहे. तर संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. आणि गायक गोगावले यांनी त्यांच्या सुरल्या आवाजात हे गाणं गायलं आहे. हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल झालं आहे. आणि ह्या गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलीच पसंती मिळाली आहे.

चित्रपटाविषयी काही प्रश्न :

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कोण साकारणार आहे ?

या चित्रपटात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील हे दिसणार आहेत.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि कोणत्या भाषेत असणार आहे ?

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि हा चित्रपट मराठीत असणार आहे.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते कोण आहेत ?

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे हे आहेत तर निर्माते गोवर्धन दोलताडे आहेत.

Leave a Comment