नमस्कार मित्रांनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरु झालेली आहे. या संदर्भात जी. र. आलेला आहे. महिलांना व मुलींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर मग या संदर्भात अर्ज कसा करायचा,कुठे करायचा, त्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, या योजनेसाठी पात्रता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, संपूर्ण माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटालीत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केली घोषणा :
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आंतरिक अर्थसंकल्प सभागृहात मंडला. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची घोषणा केली. मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह सरकारने 26 जानेवारी 2023 मध्ये ‘ लाडली बहना योजना ‘ सुरु केली होती. या योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होत. तर महाराष्ट्रातल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ ज्या योजनेवरून घेतली गेल्याचं बोललं जातंय, ती मध्य प्रदेशची ‘ लाडली बहना योजना ‘आहे. शिवराज सिंह चौहान यांनी गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदन मिळावी म्हणून हि योजना सुरु केली होती.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत कमीत कमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणार आहे ?
महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा,घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटोंबिक उत्त्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आणि योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे.अश्या महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1 हजार 500 रुपये जमा केले जाणार आहेत.
या योजनेसाठी कोण अपात्र असणार आहे ?
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
या योजनेच्या लाभासाठी कोणती कागदपत्रे जरुरी आहेत ?
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिला हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करू शकतात.योजनेचा अर्ज पोर्टलवरून पण ऑनलाईन भरू शकतात. आणि ज्यांना अर्ज करता येत नाही. त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात. शिवाय अर्जासोबत वर दिलेली सगळी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.अर्ज करणारी व्यक्ती हि महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल.
लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार ?
या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून अर्ज करता येणार आहेत. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर 16 जुलैला तात्पुरती पात्र लाभार्थिंची यादी प्रकाशीत केली जाईल. तर 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. 14 ऑगस्टला प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर प्रत्येक महिलन्याच्या 15 तारखेला हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.