केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सम्मान निधी योजन सुरु आहे. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. पण हे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी दिले जात नाहीत , तर ते २ हजार रुपयांचे तीन सामान हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं हाच या योजने मागचा उद्धेश आहे. पीएम किसान सम्मान निधी यिजना ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे . आता पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता आपल्या खात्यात कधी जमा होणार यायची सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !
पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांची आतुरता संपलेली आहे. पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई – केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. याशिवाय शेतकऱ्याच्या जमिनीची नोंदणी करणेही आवश्यक आहे.जर तुम्ही हे केलेले असेल तर तुम्ही १७ व्या हप्त्यासाठी पात्र आहात .
मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पीएम किसान सम्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. मात्र पीएम किसानचा (PM Kisan Yojana) पुढचा हप्ता कधी येणार याबद्धल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
E-KYC करणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्त्याची रक्कम मिळणार नाही…
या योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र सरकार शेतकरी बांधवाना ६००० रुपयांची आर्थिक मदत देते. ही मदत प्रत्येक ४ महिन्याला २००० रुपयांच्या हप्त्याद्वारे दिली जाते. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार कडून १६ हप्ते जमा झाले आहेत.आता जर तुम्हाला १७ वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे E-KYC करणे अनिवार्य आहे. जर तुमचे केलेले नसेल तर तुह्माला पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळणार नाही.
शेतकऱ्यांनी पीएम किसान ई केवायसी कशी करायची ?
- पीएम-किसान वेबसाइटवर लॉग इन करा.
- “फार्मर्स कॉर्नर” वर जा आणि ई-केवायसी पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक टाइप करा आणि “शोध” बटण दाबा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा आणि आता “Submit OTP” बटणावर क्लिक करा.
- ई-केवायसी प्रक्रिया केली जाते.
किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करू शकता.
पीएम किसान योजने विषयी काही प्रश्न :
पीएम किसान योजना कधी सुरु करण्यात आली व त्या योजनेचा काय उद्धेश आहे ?
पीएम किसान निधी योजना ही १ डिसेंबर २०१८ रोजी सुरु करण्यात आली. आणि पीएम किसान निधी ही योजना केंद्र सरकारची आहे, ज्याचा उद्धेश लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत किती वेळा शेतकऱ्यांना हप्ते वितरित केले जातात ?
पीएम किसान योजयोजनेला संपूर्णपणे केंद्र सरकार कडून निधी दिला जातो व पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्याला वितरित केले जातात.